कोलकाता मधील ताला टँक परिसरात सोमवारी झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
कोलकाता- कोलकाता मधील ताला टँक परिसरात सोमवारी झालेल्या दोन गावठी बॉम्बच्या स्फोटात एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
ताला परिसरामध्ये सोमवारी सकाळी हा स्फोट झाला. यामध्ये आणखी एक मूल जबर जखमी झाले आहे.
घटनास्थळी अन्य दोन गावठी बॉम्ब सापडले असून बॉम्ब शोध आणि नाशक पथकाला बॉम्ब निकामी करण्यात यश आले आहे.