कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडने त्यांच्या वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल आणि बायजूचे शैक्षणिक अॅप घेणा-या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.
२००९ मधील शुभारंभानंतर कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रम भारतातील मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आला आहे. आजवर १०० शहरांमधील १००० पेक्षा जास्त कुटुंबांना यामुळे त्यांच्या मुलांना नृत्य, क्रीडा, संगीत आदी शिक्षण क्षेत्रात एक उज्ज्वल भविष्य देता आले आहे.
मागच्या तीन वर्षात सुमारे १४.८ दशलक्ष मुलांनी या शिष्यवृत्ती कार्यक्रमात भाग घेतला आहे. २०१७ च्या आवृत्तीत सुमारे ०.९ लाख ग्राहकांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिल्या जाणा-या बायजूच्या अभ्यास-साहित्याचा लाभ झाला आहे. बायजूचे मोफत सभासदत्व ग्राहकांना चौथी ते बारावीपर्यंत गणित आणि विज्ञानाच्या शिकवणीचे व्हीडिओ देते, तसेच याचा वापर बायजूच्या अॅपवर एक खास कोड वापरून करता येतो. हा कोड कोलगेट शिष्यवृत्तीच्या पॅकच्या आतल्या बाजूला छापलेला असतो. ज्यांना बायजूचे अॅप उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी अभ्यासक्रमाच्या शिकवणीचे व्हीडिओ तयार करण्यात आले आहेत, जे शिष्यवृत्तीच्या पॅकवर छापलेल्या एका टोल-फ्री नंबरवर उपलब्ध आहेत.
कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बचालानी म्हणाले की, या वर्षी आम्ही फक्त शिष्यवृत्त्याच वाढवलेल्या नाहीत तर शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून बायजूचे शैक्षणिक अॅप मोफत उपलब्ध करून देऊन आम्ही बायजूशी असलेले आमचे संबंधही जोपासले आहेत. जास्तीत-जास्त भारतीय कुटुंबांना/मुलांना या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
शिष्यवृत्ती कार्यक्रमात कसे सहभागी व्हावे?
कोलगेट शिष्यवृत्ती पॅकवर छापलेल्या टोल-फ्री नंबर १८००३१३४५७५ वर एक मिस्ड कॉल द्या, मौखिक आरोग्याविषयीच्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि कोलगेट शिष्यवृत्तीची संधी मिळवा.
१ जून २०१८ रोजी सुरू झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या अटी आणि नियमांसाठी www. colgtecres.co.in येथे भेट द्या.