भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय (वनडे) फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली.
दुबई- भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आयसीसी एकदिवसीय (वनडे) फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली. संघांमध्ये भारताने दुसरे स्थान राखले.
अव्वल दहा फलंदाजांमध्ये कोहली व्यतिरिक्त डावखुरा सलामीवीर शिखर धवन आणि वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील आहेत. धवन सातव्या तसेच धोनी नवव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सने अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
गोलंदाजीत ‘टॉप टेन’मध्ये ऑफस्पिनर आर. अश्विनच्या रूपाने एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या तसेच दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीर दुस-या स्थानावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या (११० रेटिंग गुण) क्रमवारीत सुधारणा झाली असून ते तिस-या स्थानी पोहोचलेत. १०९ रेटिंग गुणांसह न्यूझीलंड स्थानी आहे. १२९ गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्व्ल स्थानी कायम आहे.