अमेरिकेचा गोलकीपर टिम हॉवर्ड ‘संरक्षण सचिव’ बनला आहे. ऐकून आश्चर्य वाटेल…
वॉशिंग्टन- अमेरिकेचा गोलकीपर टिम हॉवर्ड ‘संरक्षण सचिव’ बनला आहे. ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र बेल्जियमविरुद्ध गोलसाठीचे विक्रमी १६ ‘टार्गेट’ वाचवणा-या हॉवर्डच्या चाहत्याने हा चमत्कार घडवला आहे. या चाहत्याने विकिपिडियावरील संरक्षण सचिवाच्या (चक हॅगेल हे संरक्षण सचिव आहेत) नावात बदल करत हॉवर्डचे नाव समाविष्ट केले.
अर्थातच काहीवेळाने संबंधितांनी पुन्हा हॅगेल यांचे नाव समाविष्ट केले. विशेष म्हणजे हॉवर्डने नोंदवलेल्या विक्रमानंतर दस्तुरखुद्द हॅगेल यांनी त्याचे अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांच्या खात्यातर्फे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात हॉवर्ड हा खराखुरा संरक्षण सचिव होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया हॅगेल यांनी दिली होती. त्यानंतर हा आगळावेगळा ‘जोक’ झाला.