आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची चारा घोटाळ्याप्रकरणातील इतर खटल्यातून आपले नाव वगळण्याची मागणी करणारी याचिका सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
रांची – चारा घोटाळ्याप्रकरणातील इतर खटल्यातून नाव वगळण्याची मागणी करणारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची याचिका केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
१९९० मध्ये देवगड तिजोरीतून ९६ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरसी६४ए/९६ या खटल्यामधून नाव वगळण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका यादव यांनी दाखल केली होती. ए. के राय यांनी ही याचिका फेटाळून लावली.
दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३०० आणि २२० च्या अंतर्गत एकाच गुन्हासाठी ज्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या व्यक्तीला अन्य खटल्यात दोषी ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे या कलमांतर्गत यादव यांचे नाव इतर खटल्यांतून वगळण्यात यावे अशी मागणी यादव यांच्या वकिलांनी केली होती.
३० सप्टेंबर रोजी बिहारमधील चाईबासा इथल्या कोषागारातून ३७.७ कोटींचा निधी गायब केल्याप्रकरणी यादव याना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.