चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी गुरुवारी दुपारी नरेंद्र मोदी यांना फोन करुन, पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
बिजींग – चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी गुरुवारी दुपारी नरेंद्र मोदी यांना फोन करुन, पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी चीनी पंतप्रधानांनी भारतासोबतचे व्दिपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. भारताच्या परराष्ट्र धोरणात चीन महत्वाचा देश असून, व्दिपक्षीय संबंध अधिक भक्कम करण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करेल असे मोदींनी सांगितले.
चीन बरोबर आर्थिक संबंध विकसित करण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली. मोदींनी यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्सी जिनपिंग यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.