कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेल्या काँग्रेसचे नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांना परदेश प्रवास करण्याची विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली.
नवी दिल्ली- अमरकोंडा मुर्गंदंगलमधील कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेल्या काँग्रेसचे नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांना परदेश प्रवास करण्याची विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. व्यापारानिमित्त परदेशात जाण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. ते १४ जून ते २९ जूनदरम्यान परदेशी प्रवास करणार आहेत.
अमरकोंडा मुर्गंदंगलमधील कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.
याप्रकरणी काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसामंत्री दसरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि अन्य सात जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती भारत पारशर यांनी २२ मे रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणालाही देशाबाहेर जाता येणार नसल्याचे त्यावेळी न्यायालयाकडून स्पष्ट बजावण्यात आले होते.