दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अडकलेल्या सर्व निसर्गप्रेमींसाठी वृक्ष, पशू, पक्षी व फुलपाखरे आणि त्यांचे जग जाणून घेण्याची एक संधी बीएनएचएस संवर्धन शिक्षण केंद्राने दिली आहे. नऊ महिन्यांच्या या कालावधीत भारताची जैवविविधता, नसíगक अधिवास, संवर्धन समस्या व जीवनशैली याविषयी बीएनएचएसतर्फे माहिती देण्यात येणार आहे.
आजच्या वेगवान, तंत्रज्ञानावर आधारित आणि झपाटयाने शहरीकरण होत असलेल्या जगात आपल्यापैकी बहुतेक जण निसर्गाला विसरत चालले आहेत. पण निसर्ग आपल्यापासून कधीच दूर नसतो. आसपासच्या परिसरात आढळणारा महाकाय पिंपळ वृक्ष किंवा चिवचिवणारी लहानशी चिमणी आपल्याला नेहमीच रम्य निसर्गाची एक झलक दाखवत असते.
मानवी जीवन कितीही ‘प्रगत’ किंवा अत्याधुनिक झाले तरी निसर्गाच्या दैवी सौंदर्याशिवाय आपण अपुरे आहोत, कारण निसर्गातूनच आपल्या बहुतांश गरजा पूर्ण होत असतात – अगदी ‘मन:शांती’सुद्धा.
बीएनएचएस संवर्धन शिक्षण केंद्र (सीईसी), मुंबई, आपला लोकप्रिय जैवविविधता संवर्धन नेतृत्व अभ्यासक्रम [[Leadership Course in Biodiversity Conservation (LCBC] २०१६-२०१७चा वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
दैनंदिन जीवनाच्या धावपळीत अडकलेल्या सर्व निसर्गप्रेमींसाठी वृक्ष, पशू, पक्षी व फुलपाखरे आणि त्यांचे जग जाणून घेण्याची हा अभ्यासक्रम म्हणजे एक सुवर्ण संधी आहे.
अभ्यासक्रम व त्याची उपयुक्तता
या मिश्र अशा अर्ध-वेळ प्रमाणपत्र अभ्यासक्रमात बीएनएचएसच्या तज्ज्ञांनी बनवलेले व वेळोवेळी सुधारित रूपात आलेले ऑनलाईन शैक्षणिक साहित्य व अभ्यास दौरे समाविष्ट आहेत. सदर अभ्यासक्रम नवे व हौशी निसर्गप्रेमी, तसेच जैवविविधता व पर्यावरण क्षेत्रात काम करणारे, अशा दोघांना उपयुक्त असेल.
अभ्यासक्रमाची वैशिष्टय़े खालीलप्रमाणे
» अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर बीएनएचएसतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.
» भारताची जैवविविधता, नसíगक अधिवास, संवर्धन समस्या व जीवनशैलीबाबत उपयुक्त माहिती.
» बीएनएचएस तसेच इतर संस्थांमधील तज्ज्ञ व शास्त्रज्ञांना भेटण्याची व संवाद साधण्याची संधी.
» आपल्या परिसरातील जैवविविधता व निसर्गाची शस्त्रीय पद्धतीने नोंदणी करण्याची संधी, ज्याचा उपयोग ते प्रकाशित करण्यासाठी व बीएनएचएस सीईसीमध्ये मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यासाठी होऊ शकतो.
» आपल्या कार्यक्षेत्रात शाश्वत पद्धतींवर आधारित बदल घडवून निसर्ग संवर्धन साधण्याची संधी.
पात्रता
भारताची जैवविविधता, निसर्ग व त्याच्या संवर्धनाची आवड व इच्छा असलेले सर्व जण या अभ्यासक्रमास पात्र आहेत. सहभागी होणाऱ्यांनी किमान १०वी उत्तीर्ण असावे, तसेच संगणक व इंटरनेट वापरता येत असावे. त्याचबरोबर आठवडयातील काही काळ अभ्यासक्रमासाठी देण्याची तयारी असावी.
पाठय़क्रम
या अभ्यासक्रमात जैवविविधता, परिसंस्था, निसर्ग संवर्धन, सस्तन प्राणी, उभयचर/सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, सागरी जीव इत्यादी विषयांवर धडे व गृहपाठ असेल. सोप्या इंग्रजीत लिहिलेल्या या धडय़ांमध्ये जागोजागी विषयानुरूप चित्रे व आकृत्या दिलेल्या असतील.
अभ्यासक्रम कालावधी
अभ्यासक्रमाचा कालावधी नऊ महिन्यांचा आहे (जून २०१६ ते फेब्रुवारी २०१७). ऑनलाईन धडे व गृहपाठ दर महिन्याच्या पहिल्या आठवडयात सहभागी होणाऱ्यांना पाठविले जातील. संवाद साधण्यासाठी फेसबुक व गुगल टॉक यासारखी ऑनलाईन माध्यमे वापरली जातील.
निसर्ग पदभ्रमण दौरे शक्यतो रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील, तसेच निसर्ग शिबिरे सुद्धा सुट्टीच्या दिवसांना जोडून आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या महिन्यात ओळ शिबिर तर शेवटच्या महिन्यात समारोप शिबिर मुंबई सीईसीमध्ये असेल.
गृहपाठात धडे, निसर्ग शिबिरे व अभ्यास दौरे या व्यतिरिक्त ई-माहिती, ऑनलाईन संशोधन, निसर्गस्नेही दिन, शिबिर वृत्त, ऑनलाईन गप्पा व अभ्यास प्रकल्प यांचा समावेश असेल.
अभ्यासक्रमाचे शुल्क
सदर अभ्यासक्रमाचे शुल्क १० हजार रुपये असून, त्यात बीएनएचएस तज्ज्ञांचे ऑनलाईन व अभ्यास शिबिरांदरम्यान मार्गदर्शन, धडे, गृहपाठ, मूल्यांकन व सीईसीमधील शिबिरांदरम्यानचे जेवण आणि नाश्ता समाविष्ट आहे. अन्य ठिकाणी होणाऱ्या शिबिरांचे शुल्क वेगळे आकारले जाईल. बीएनएचएसच्या सदस्यांना अभ्यासक्रमाच्या मूळ शुल्कावर १० टक्के सवलत मिळेल.
नोंदणी
नोंदणी अर्ज www.bnhs.org या संकेतस्थळावर मिळेल किंवा leadbiodiv100@gmail.com या ई-पत्त्यावरून मागवता येईल. अभ्यासक्रमाचे शुल्क डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरद्वारे भरता येईल. अधिक माहितीसाठी ०२२२८४२९४७७ किंवा ९५९४९५३४२५ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.