विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला.
चितगावग – ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडने वीस षटकात १६८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि विल्यिमसनने विजयासाठी शर्थ केली मात्र अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने न्यूझीलंडला निसटता पराभव स्वीकारावा लागला.
विल्यिमसनने ३५ चेंडूत (५१) आणि टेलरने ३७ चेंडूत (६२) धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेनने भेदक मारा करत चार षटकात १७ धावा देत चार गडी बाद केले. इम्रान ताहीरने दोन आणि मॉर्नी मॉर्केलने एक गडी बाद केला.
तत्पूर्वी जेपी डयुमिनीच्या झंझावती नाबाद ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड समोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेकडून डुयूमिनीने सर्वाधिक (८६) आणि सलामीवीर हाशिम आमलाने (४१) धावांची खेळी केली.
अन्य फलंदाजांनी मात्र निराशा केली.न्यूझीलंडकडून साऊथी आणि अँण्डरसनने प्रत्येकी दोन, मॅकलन आणि मिल्सने एक गडी बाद केला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.