महावितरणच्या कोलशेत उपविभागाच्या वीजवाहिनींचे देखभाल-दुरुस्तीचे काम शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
ठाणे – महावितरणच्या कोलशेत उपविभागाच्या वीजवाहिनींचे देखभाल-दुरुस्तीचे काम शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
आठ लाखांची वीजचोरी पकडली
ठाणे : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडळाने धडक मोहीम राबवत गुरुवारी ठाणे व मुंब्रा-कौसा येथे धाडी टाकल्या. यावेळी आठ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली. या वीजचोरांवर फक्त दंडाची कारवाई न करता त्यांची उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
कल्याणमध्ये अवाजवी विजेची बिले
कल्याण : कल्याण शहरात मीटर रीडिंग न घेताच अवाजवी वीजबिले पाठविण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. त्यामुळे याची तपासणी करून ग्राहकांना वाजवी बिले देण्यात यावीत, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक रमेश जाधव यांनी दिला आहे.