सध्या सुरू असलेल्या ‘‘किड्स फॉर ए कॉज’’ उपक्रमासह, किडझेनिया, मुंबईने नुकतेच ५० एनजीओ मुलांसाठी ‘‘डे आऊट अॅट किडझेनिया’’ हा उपक्रम राबवला. ऋषी वाल्मिकी स्कूल व संकल्पमधील मुलांनी थीम पार्कला भेट दिली. समाजावर शिक्षण, पर्यावरण व आरोग्याच्या क्षेत्रामध्ये प्रभाव निर्माण करण्याकरिता मुलांना सक्षम करणे, हा या उपक्रमामागील मुख्य विचार होता. मुलांनी किडझेनिया, मुंबई येथे भरपूर मौजमजा केली.
उपक्रमाबाबत बोलताना, किडझेनिया इंडियाचे सीएमओ विराज जित सिंग म्हणाले, ‘‘किडझेनियाचा दृष्टिकोन मुलांना जगाला उत्तम स्थळ बनविण्याकरिता सक्षम करण्याद्वारे त्यांचे विचार व बुद्धीला चालना देण्याचा आहे. आमच्या दृष्टिकोनासह, आम्ही एनजीओंना पाठिंबा देतो आणि किडझेनिया मुंबई व दिल्ली एनसीआर येथे वंचित मुलांना आनंदमय अनुभव मिळण्याची सुविधा करतो.’’