भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मुंबई – भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, अजित वाडेकर आणि दिलीप वेंगसरकर यांनीही ढोणीच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले.
‘माझ्यासाठी ही खरचं आश्चर्यजनक बातमी आहे. मला वाटले होते की ढोणी कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक ते दोन वर्ष खेळेल’ अशी प्रतिक्रिया वेंगसरकर यांनी दिली. तर हे खरंच आश्चर्यजनक आहे. हा निर्णय तो याआधी घेऊ शकला असता. कदाचित ढोणीला निवृत्त होण्यासाठी ही वेळ योग्य वाटली असेल असे बोर्डे यांनी सांगितले.
‘मला वाटते की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर ढोणीने निवृत्त व्हायला हवे होते. याआधीही अंगठ्याच्या दुखापतीमुळे ढोणीने मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता’. असे वाडेकर म्हणाले.
ढोणीने निवृत्ती जाहीर केल्याने ऑस्ट्रेलिया मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याचे कर्णधारपद विराट कोहली भूषवणार आहे.