राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना द्रमुकच्या कुठल्याही खासदाराने पत्र लिहिल्याचे समोर आले तर, त्याच्यावर कठोर कारवाई करु असे करुणानिधी यांनी गुरुवारी सांगितले.
चैन्नई – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना द्रमुकच्या कुठल्याही खासदाराने पत्र लिहिल्याचे समोर आले तर, त्याच्यावर कठोर कारवाई करु असे द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी गुरुवारी सांगितले.
मोदींना व्हिसा मिळू नये यासाठी पक्षाच्या खासदारांनी कुठल्याही पत्रावर स्वाक्ष-या केल्या असतील तर, ते अजिबात सहन केले जाणार नाही. आपण अशा कुठल्याही पत्रावर स्वाक्ष-या केल्या नसल्याचे खासदारांनी आपल्याला सांगितले आहे असे करुणानिधी यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरण आणि अंतर्गत विषयात द्रमुक कुठलाही हस्तक्षेप करणार नाही असे करुणानिधी यांनी स्पष्ट केले.
मोदींना व्हिसा देऊ नये यासाठी संसदेतील काही खासदारांनी ओबामांना पत्र लिहीले असून, त्यात द्रमुकच्या के.पी.रामलिंगम यांचाही समावेश आहे असे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर करुणानिधी यावर आपली भूमिका स्पष्ट केली.