भारताचा अनुभवी सलामीवीर वीरेंदर सेहवागने आगामी देशांतर्गत मोसमात दिल्लीऐवजी हरयाणा संघातर्फे खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
फरीदाबाद – भारताचा अनुभवी सलामीवीर वीरेंदर सेहवागने आगामी देशांतर्गत मोसमात दिल्लीऐवजी हरयाणा संघातर्फे खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली ड्रिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनकडून (डीडीसीए) काही दिवसांपूर्वीच तशी त्याने परवानगी घेतली आहे. ‘‘आगामी डोमेस्टिक मोसमात मी हरयाणातर्फे खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावंत युवा क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यासोबत अनुभव ‘शेयर’ करायला मला आवडेल.
डीडीसीएतर्फे मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’’ असे सेहवागने शनिवारी म्हटले. १९९७-९८पासून (गेले १८ हंगाम) देशांतर्गत क्रिकेटमध्ये सेहवाग दिल्लीचे प्रतिनिधित्व करतोय. तब्बल १०४ कसोटी सामन्यांत २३ शतकांसह ८५८६ धावा केलेला ३६ वर्षीय वीरू गेली तीन वर्षे संघाबाहेर आहे.