Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeमध्यंतरउमंगदिवाळीतली धम्माल

दिवाळीतली धम्माल

आज दिवाळी.. अगदी आवडीने तुम्ही फराळ खाल्ला असेल. पहिल्या दिवशी जितका फराळ खाल्ला जातो तितका इतर दिवशी खाल्ला जात नाही. फराळावर ताव मारल्यानंतर मित्रमैत्रिणींना-नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असाल. हे सगळं केलं तरीही दिवसभर बराच वेळ असतो. मग हा वेळ घालवण्यासाठी तरुणाई शिकते, नोकरी करते किंवा सामाजिक उपक्रमात सहभागी होऊनही दिवाळीचा आनंद लुटते.

DIWALI-IMAGEROX-1हूश्श.. परीक्षा संपल्या आणि एकदाची सुट्टी लागली. परीक्षेच्या ताणानंतर सुट्टी मिळाली की काय मजाच. त्यात दिवाळीची सुट्टी म्हटलं तर डबल मजा. दिवाळी म्हणजे सगळीकडे उत्साह, आनंद, चैतन्य. सगळी मरगळ झटकून दिवाळीची कामं करण्यात एक वेगळाचं उत्साह असतो. आकाश कंदील आणि दिव्याच्या रोषणाईमुळे सगळं काही तेजोमय झालेलं असतं. त्यात सुट्टी असल्यामुळे या मजेत आणि आनंदात भरच पडते. एरवी सुट्टी असली की आपण आरामशीर उठतो, पण दिवाळीत लवकरच उठावं लागतं. मग सकाळी उठून आई-वडिलांना मदत करणं, पहाटेचं फटाके लावणं किंवा आंघोळ-देवपूजा करून फराळाचा मनसोक्त आस्वाद घेणं हीच कामे तरुणाईला असतात. त्यानंतर आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तसंच जलद गतीने व्हॉटसअ‍ॅपवरून शुभेच्छा पाठवण्याचं काम तरुणाई करते. मोबाईलच्या या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा तरुणाई पुरेपूर उठवताना दिसते.

व्हॉटसअ‍ॅपवर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर स्वत:चा एक सेल्फी काढून किंवा एखाद्याला फोटो काढायला सांगून तो फोटो लगेच डिपी म्हणून ठेवला जातो. अशी काहीशी धम्माल सणासुदीला असते. त्यातील निवडक जणांनाच फोन करून शुभेच्छा दिल्या जातात. ज्यांच्याकडे अ‍ॅन्ड्राइड फोन नाही त्यांना मेसेज करावा लागतो, पण दिवाळीत एका मेसेजचा एक रुपया असल्यामुळे फोन करण्याला जास्त पसंती दिली जाते. पहिला दिवस सोडला तर इतर दिवशी तसं फारसं काम नसतं. अशावेळी तरुणाई एखादा कमी दिवसांचा म्हणजेच झटपट शिकता येईल असा कोर्स करते. काहीजण समाजकार्यात वेळ घालवतात तर काही जण कट्टयावर बसून गप्पा मारत बसतात. बहुतांश मुली सुट्टीत ब्युटीपार्लरचा कोर्सकरतात किंवा वॉल पेटिंग, ग्लास पेटिंग, फ्लावर मेकिंग यांसारखे छोटे कोर्स शिकतात आणि आपला छंद जोपसण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर घरी बसून टीव्ही पाहण्याला जास्त पसंती देतात.

इंटर्नशिपचा पर्याय बेस्ट !

दिवाळीच्या आधी एक दिवस परीक्षा संपल्या. त्यामुळे दिवाळीचे पाच एक दिवस मज्जेत घालवल्यानंतर करायचं काय असा प्रश्न दरवर्षीचा आहे. गेले चार पाच वर्ष दिवाळीची दहा पंधरा दिवसाची सुट्टी एन्जॉय करण्यात पिकनीक, मुव्ही इथे तिथे भटकण्यात आम्ही घालवली त्यामुळे या वर्षी आपण दरवेळीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. आमच्या संपूर्ण इंजिनीअरच्या ग्रुपनं ठरवलं की या वर्षी दिवाळीच्या सुट्टया एन्जॉय करण्यापेक्षा किंवा त्या घरी बसून वाया घालवण्यापेक्षा या पंधरा दिवसात इंटर्नशिप करायची. त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न पण सुरू केले. ग्रुपमधल्या सगळ्यांनाच इंटर्नशिप करायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही. पण इतर जे मित्रमैत्रिणी काही अडचणीमुळे इंटर्नशिप करू शकत नाही, त्या आमच्या मित्रमैत्रींणी आम्ही या काळात कोणत्या नवीन गोष्टी शिकलो, वर्कशॉपमधल्या कामाची पद्धती काय होत्या ते त्यांना नंतर शिकवायचं असंही कबुल केलं. – चित्रा नाईक

गरिबांबरोबर साजरी करतो दिवाळी !

माझं कुटुंब मोठं असल्यामुळे दिवाळीची सुट्टी कशी जाते हे कळतंच नाही. आमच्याकडे दोन आठवडयाआधीच दिवाळीची लगबग सुरू होते. महिला वर्ग एकत्र फराळ करतात आणि पुरुष इतर कामं करतात. आम्ही त्यांना मदत करतो. दिवाळी आल्यानंतर आमची माळी, वाडी दिव्यांनी आणि तोरणांनी सजलेली असते. एकमेकांकडे जाऊन मजा करणं हा एकमेव उद्योग असतो. घरातले मोठे दिवाळी म्हणून जे पैसे देतात आणि आमच्याकडची जी पॉकेटमनी असते, ते सगळे पैसे मी आणि माझी भावंड जमा करतो. त्यानंतर या पैशांनी आम्ही दिवे आणि मिठाई घेऊन गरिबांच्या झोपडीत जाऊन त्यांना ती मिठाई देऊन त्यांच्या दारात किमान दोन दिवे लावतो. त्यांच्या चेह-यावरचा तो आनंद बघून आम्हालाही बरं वाटतं. एरवी उनाडक्या करत फिरणारे आम्ही एकदिवस एखाद्याच्या चेह-यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतो.- दर्शन माळी  

आईला मदत करणार!

दिवाळीची सुट्टी ही परीक्षा संपल्या संपल्या असल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झालेला असतो. आम्ही सगळे फ्रेण्डस भेटतो. सगळ्याकडे फराळाला जाणं असाच नेहमीचा ठरलेला बेत असतो. पण यावेळी मी माझ्या आईला मदत करणार आहे असं मी ठरवलं आहे. आई सतत काम करत असते. मी कॉलेजमध्ये असल्यामुळे मला तिला मदत करता येत नाही. म्हणून यावेळी मी ठरवलं आहे तिला जमेल तितकी मदत करायची. दिवाळी पूर्वी घरची साफसफाई आणि फराळ करण्यात आईचा वेळ जातो, त्यात ती खूप थकते. त्यानंतर दिवाळी सुरू झाली की येणाऱ्या पाहूण्यांची उठाबस करावी लागते. त्यामुळे तिला दिवाळी साजरीच करता येत नाही. म्हणून मी तिला मदत करणार आहे.- रिचा परमार

बहिणीकडून ब्युटीपार्लरचं प्रशिक्षण !

आईला मदत करून, घरातली इतर कामं झाली की मी बहिणीकडून ब्युटीपार्लरचं प्रशिक्षण घेते. माझ्या बहिणीने ब्युटीपार्लरचा रितसर कोर्स केला आहे. मेहंदी काढणं, केस कापणं अशा गोष्टी तिच्याकडून शिकते आणि तिला तिच्या कामातसुद्धा मदत करते. जेणेकरून नकळत माझा सरावही होतो आणि तिला मदतसुद्धा होते. पैसे देऊन एखादा कोर्स करण्यापेक्षा बहिणीकडूनच मी शिकते, त्यामुळे वेळही जातो आणि काहीतरी शिकल्याचा आनंदही मिळतो. – काजल भद्रेसा

ग्रुपबरोबर धम्माल!

दिवाळीच्या सुट्टीत मी आणि माझ्या ग्रुपसोबत एकमेकांच्या घरी जातो. माझ्या ग्रुपमध्ये दहा जण आहेत. प्रत्येक दिवशी किमान दोन जणांच्या घरी जायचं आणि फराळाचा आस्वाद घ्यायचा. खरं तर त्यात फराळ कमी खाल्ला जातो आणि धम्माल जास्त केली जाते. त्यात प्रत्येकाच्या घरी गेल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनासुद्धा बरं वाटतं. सगळ्यांकडे जाऊन आल्यानंतर एखाद्या आइस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन, गप्पा गोष्टी करत आइस्क्रीम खातो. त्यानंतरसुद्धा वेळ उरलाच तर आम्ही फटाके लावतो. – पूजा गुप्ता

दिवाळी आजीच्या घरी !

आम्हाला फक्त दोन दिवसच सुट्टी असल्यामुळे मी माझ्या आजीकडे भाऊबीजेसाठी जाणार आहे. तिथे माझी सख्खी चुलत भावंड येतात. सणासुदीतच आम्ही एकमेकांना भेटतो. इतर वेळी सगळे कॉलेज आणि ऑफिसला असल्यामुळे भेटण्याचा कितीही विचार केला तरीही सगळ्यांच्या वेळा जुळणं अशक्यच असतं. रक्षाबंधन, भाऊबीज या अशा गोष्टी आहेत जिथे कोणतीही कारणं चालत नाहीत. या दिवशी आम्ही भेटून खूप मज्जा करतो. फटाके फोडण्यात पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशाने आम्ही गरिबांसाठी मिठाई घेतो आणि ती त्यांना जाऊन देतो. – प्रीता झगडे

घरच्यांना मदत करतो !

माझ्या घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मला जेव्हा सुट्टी किंवा वेळ असेल तेव्हा मी काहीना काही काम करतो. कॉलेज सुरू असताना तितकासा वेळ मिळत नाही म्हणून सुट्टीत मी काम करतो. यावेळी मी साधा कंदिलांचा आणि फटाक्यांचा स्टॉल लावाला आहे. या कामात मला माझी लहान बहीण आणि आई मदत करते. या कामात मला बऱ्यापैकी पैसे मिळतात. माझ्या पैशांमुळे घरची परिस्थिती सुधारणारी नाही, पण किमान हातभार लागेल या उद्देशाने मी करतो. माझ्या घरच्यांना मदत करून मला बरं वाटतं. अशी आनंदात माझी सुट्टी जाते.- हितेश कदम

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट