पहिल्या डावाच्या आघाडीवर पश्चिम विभागावर मात करत उत्तर विभागाने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
चेन्नई- पहिल्या डावाच्या आघाडीवर पश्चिम विभागावर मात करत उत्तर विभागाने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अनिर्णित लढतीत उत्तरेचा कर्णधार शिखर धवनने सामनावीराचा पुरस्कार पटकवला.
पहिल्या डावात ३२० धावांची आघाडी घेणा-या उत्तर विभागाने चौथ्या दिवशी मंगळवारी चहापानाला दुसरा डाव सात बाद २०८ धावांवर घोषित केला. ५२९ धावांच्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना दिवसअखेर दोन बाद ६९ धावा केल्या. चौथ्या दिवशी कर्णधार धवनसह (५०), कर्णधार राहुल देवन (४५) आणि पारस डोग्राच्या (नाबाद ३६) समयोचित फलंदाजीमुळे उत्तर विभागाने दोनशेपार धावा केल्या.
पश्चिम विभागाच्या फलंदाजांना हाराकिरी केली तरी कमलेश मकवानाने (८०-५) निम्मा संघ गारद करताना सामन्यात १० विकेट्स घेण्याची करामत साधली. पहिल्या डावातील शतकवीर कर्णधार धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.