आयपीएलच्या शनिवारी (२५ एप्रिल) होणाऱ्या दुस-या लढतीत माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जची गाठ घरच्या मैदानावर किंग्ज इलेवन पंजाबशी आहे.
चेन्नई – आयपीएलच्या शनिवारी (२५ एप्रिल) होणा-या दुस-या लढतीत माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जची गाठ घरच्या मैदानावर किंग्ज इलेवन पंजाबशी आहे.
चेन्नईने पाच लढतीनंतर चार विजयांसह दुसरे स्थान राखले आहे. याउलट सहाव्या स्थानी असलेल्या पंजाबला केवळ दोन लढती जिंकता आल्यात. कमालीचे सातत्य पाहता पंजाबविरुद्ध चेन्नईचे पारडे जड वाटते. बहरलेली फलंदाजी हे चेन्नईच्या यशाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरलेय. ड्वायेन स्मिथसह ब्रेंडन मॅककलमने चांगली फलंदाजी केलीय.
मॅकक्युलमला एकच मोठी खेळी करता आली असली तरी त्याने झटपट सुरुवात करून दिलीय. डावखुऱ्या सुरेश रैनाला सूर गवसल्याने यजमानांची फलंदाजी अधिक मजबूत झालीय. चेन्नईची गोलंदाजी प्रभावी ठरतेय. मध्यमगती आशिष नेहरासह ड्वायेन ब्राव्होने अचूक मारा केलाय. ईश्वर पांडेसह मोहित शर्मा, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी काळजीचे कारण नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी वाईट नसली तरी सातत्य नाही. कर्णधार जॉर्ज बेलीसह मुरली विजय, डेव्हिड मिलरला सातत्य राखता आलेले नाही. त्यातच अनुभवी सलामीवीर वीरेंदर सेहवाग आणि फटकेबाज ग्लेन मॅक्सवेल अद्याप फॉर्मच्या प्रतीक्षेत आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा आणि अनुरीत सिंग तसेच अक्षर पटेल आणि मिचेल जॉन्सनने बऱ्यापैकी कामगिरी केली तरी सातत्याचा अभाव आहे. चेन्नईची सर्व आघाडय़ांवर चांगली कामगिरी होत असल्याने पंजाबचा कस लागेल.
वेळ : रा. ८ वा.
स्टार वॉच
मॅककलम, ब्राव्हो, रैना, धोनी, नेहरा
बेली, सेहवाग, मिलर, मॅक्सवेल, संदीप