भिवंडी शहरात आपल्या लहान मुलीसह स्वतःला पेटवून घेऊन अक्षरा पागा (२४) या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.
ठाणे- भिवंडी शहरात आपल्या लहान मुलीसह स्वतःला पेटवून घेऊन अक्षरा पागा (२४) या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये अक्षराची मोठी मुलगी जास्त भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अक्षरा चेतन पागा ही महिला राहत आहे. अक्षरला दोन लहान मुली आहेत. राहत्या घरात तिने आपल्या दोन मुलींसह स्वतःला पेटवून घेतले.
शेजारी राहणा-या रहिवाशांना अक्षराच्या घरातून जळाल्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेत अक्षराच्या मोठ्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर अक्षरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज भिवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरिक्षक एस. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.