मंगळयानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पाडत असताना या यानावर देखरेख ठेवणा-या यंत्रणेला दक्षिण आफ्रिकेतील वादळाचा फटका बसला होता.
मंगळयानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पाडत असताना या यानावर देखरेख ठेवणा-या यंत्रणेला दक्षिण आफ्रिकेतील वादळाचा फटका बसला होता. त्यामुळे या यानावर देखरेख ठेवण्याच्या प्रक्रियेत पाच मिनिटांचा विलंब झाला.
‘मंगळयान’ पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी इस्रेने ‘ट्रान्स मार्स इंजेक्शन’ यंत्रणा राबवली होती. यासाठी लिक्विड इंजिन सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील हार्टबीसथोक येथील केंद्राला वादळाचा फटका बसला. यामुळे या इंजिनाने केलेल्या लिक्विड फायरिंगची माहिती मिळण्यास पाच मिनिटे उशीर झाला. यामुळे महत्त्वाची माहिती मिळू शकली नाही, असे इस्त्रोने सांगितले.
त्या वेळी हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. मात्र, या विलंबानंतरही यानाने उत्तम कामगिरी बजावत पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला.