शहरात ऑक्टोबर हिटचा उष्मा जाणवत असताना नेरळमध्ये मात्र थंडीची चाहूल लागली आहे. नेरळच्या डोंगररांगामध्ये आणि परिसरात मंगळवारी सकाळी अशी धुक्याची चादर पसरली होती.
नेरळ – शहरात ऑक्टोबर हिटचा उष्मा जाणवत असताना नेरळमध्ये मात्र थंडीची चाहूल लागली आहे. नेरळच्या डोंगररांगामध्ये आणि परिसरात मंगळवारी सकाळी अशी धुक्याची चादर पसरली होती.
त्यामुळे ऑक्टोबर हिटच्या तडाख्यात सापडलेल्या येथील पर्यटकांना गारेगार दिलासा मिळाला. पावसाने परतीची वाट धरली असताना आता थंडीने येण्याची चाहूल दिली आहे. मंगळवारी पहाटे पासून प्रचंड प्रमाणात धुके दाटले होते.
त्यामुळे पथदिवे लुकलुकत असल्याच भात होता. पहाटेच्या सुमारास पसरलेल्या या धुक्यामध्ये रेल्वे वाहतुकीला फटका बसला. या धुक्यामुळे लांबचे सिग्नल दिसत नव्हते.
त्यामुळे मुंबई कडे जाणा-या लोकल आणि मुंबई कडून येणा-या लोकल गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळी नऊ वाजेपर्यन्त धुक्याची दुलई अनुभवास मिळाली. मात्र, या धुक्यामुळे झालेल्या खोळंब्याचेही प्रवाशांनी स्वागत केले.