कोलकातामधील नादिया जिल्ह्यातील नन सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पश्चिम बंगाल सरकारची मागणी केंद्राने फेटाळून लावली.
नवी दिल्ली – कोलकातामधील नादिया जिल्ह्यातील नन सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पश्चिम बंगाल सरकारची मागणी केंद्राने फेटाळून लावली.
प्रकरणाची गांभीयर्ता ओळखून प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करणार असल्याचे सांगितले होते. तसेच या प्रकरणी सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले होते.
१४ मार्च रोजी राणाघाट मधील कॉन्व्हेंट शाळेत दरोडेखोरांनी ७१ वर्षीय ननवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी सीआयडीने दोन जणांना अटक केली आहे. मोहम्मद सलीम शेख उर्फ सलीमला मुंबईतून अटक करण्यात आली.
तर बंगालच्या नॉर्थ २४ पॅरागनस जिल्ह्यातून गोपाल सरकार या आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी गोपलला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.त्याच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम २१२ आणि २१६अ, ३९५, ३९७ आणि ३७६ या कलमान्वये खटला दाखल करण्यात आला आहे.