देशात नवे नागरी हवाई धोरण या वर्षाअखेरीस करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याआधी र्सवकष चर्चा केली जाईल, असे नागरी हवाईमंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सांगितले.
नवी दिल्ली – देशात नवे नागरी हवाई धोरण या वर्षाअखेरीस करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याआधी र्सवकष चर्चा केली जाईल, असे नागरी हवाईमंत्री अशोक गजपती राजू यांनी शुक्रवारी सांगितले. नागरी हवाई खात्याने नव्या नागरी हवाई धोरणावर सार्वजनिक मत नोंदवण्याची डेडलाईन ३० नोव्हेंबपर्यंत वाढवली आहे. याआधी ती २१ नोव्हेंबपर्यंत होती.
नव्या हवाई धोरणाच्या अंमलबजावणीविषयी राजू म्हणाले की, संसदीय सल्लागार समितीची ३० नोव्हेंबरला बैठक होणार असून यात हवाई धोरणाच्या मसुद्यावर चर्चा केली जाणार आहे. पीएचडी चेंबरने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ३० ऑक्टोबर रोजी बहुप्रतीक्षित हवाई धोरणाचा मसुदा सरकारला सादर करण्यात आला होता.
यामध्ये हवाई क्षेत्राला अधिक पूरक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबरोबरच छोटी-छोटी शहरे जोडण्यासाठी यात जोर देण्यात आला असून विविध करसवलती आणि विशेष बाब म्हणून स्थानिक विमान कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा ५० टक्क्यांपलीकडे नेण्याचीही शिफारस आहे.