जागतिक स्तरावरून आलेले सकारात्मक संकेत आणि संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १७८.३० अंकांनी वधारला.
मुंबई- जागतिक स्तरावरून आलेले सकारात्मक संकेत आणि संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी उत्साहाचे वातावरण होते. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १७८.३० अंकांनी वधारून २३,१५४.३० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ५९.१५ अंकांनी वधारून ७,०२९.७५ वर बंद झाला.
कोल इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, एमटीपीसी, एल अँड टी, अॅक्सिस बँक, आयटीसी, एचडीएफसी, टाटा मोटर्स, सिपला, आयसीआयसीआय, रिलायन्स आणि हिंदुस्थान लिव्हर आदी कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, ल्युपिन, भारती एयरटेल, गेल, विप्रो, सन फार्मा, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप ०.२ टक्क्यांनी घसरून ११,५१८.२ वर बंद झाला. स्मॉलकॅप ०.५ टक्क्यांनी घसरून ९,५५५ वर बंद झाला.