पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हि-याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे.
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हि-याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. पीएनबीने सोमवारी रात्री उशिरा स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी २०४ मिलियन डॉलर म्हणजे १३२२ कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली. या नव्या घोटाळ्यामुळे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीचा घोटाळा हा १२ हजार ६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. नीरव मोदीने केलेल्या या अवैध व्यवहाराचे मूल्य हे पीएनबीच्या वर्ष २०१७ च्या एकूण फायद्याएवढे आहे. वर्ष २०१७मध्ये सार्वजनिक क्षेत्रात दुस-या क्रमांकावर असलेल्या पीएनबीला १३२० कोटी रुपयांचा फायदा झाला होता. बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.
नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा २०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२६०० कोटी रूपयांपयर्ंत पोहोचला आहे, असे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अन्य एका फायलिंगमध्ये पीएनबीने या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केल्याचे फेटाळले आहे.