न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी वनडे सोमवारी (२८ डिसेंबर) खेळली जाणार आहे.
ख्रिईस्टचर्च- न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी वनडे सोमवारी (२८ डिसेंबर) खेळली जाणार आहे. विजयी सलामीसह यजमानांनी पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या वनडे मोठा विजय मिळवणारा न्यूझीलंड संघ सातत्य राखण्यास उत्सुक आहे. कर्णधार ब्रेंडन मॅककलम आणि सलामीवीर मार्टिन गप्टिलचा फॉर्म तसेच वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीसह डग ब्रासवेल आणि मिचेल मॅकक्लेनॅघनची त्यांना लाभलेली साथ पाहता यजमानांच्या गोटात आनंदीआनंद आहे.
न्यूझीलंडकडे आलबेल असताना प्रतिस्पर्धी संघ अद्याप फॉर्मच्या प्रतीक्षेत आहे. श्रीलंकेची सर्वच आघाडय़ांवरील कामगिरी ढेपाळली आहे. मालिकेत यजमानांना चुरस द्यायची असेल तर पाहुण्यांना वेळीच कामगिरी उंचवावी लागेल.