अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत.
अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. लहान असतानाच आपल्या बहिणीबरोबर तिने ‘यादोंकी बारात’,‘दुष्मन दोस्त’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. राज कपूर यांच्या १९७७ साली आलेल्या ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या सिनेमामध्ये तिने केलेली भूमिका खूप गाजली. लहानपणी ‘साजन बिना सुहागन’, ‘जिंदगी’ आणि ‘गेहराई’ या सिनेमामध्ये तिने अभिनय केला असून मोठेपणी ‘दो दिलो की दास्तान’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘इन्साफ का तराजू’ या सिनेमांमधून भूमिका साकारल्या. २००४ साली ‘चिमणी पाखरं’ आणि ‘मंथन’ या दोन सिनेमांमधून तिने रूपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होतं. मराठी, हिंदी भाषेतील सिनेमांबरोबरच तिने काही मल्याळम चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे.