पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग केली जाते. हे सर्वांना माहित असणारे सत्य आहे. ज्यांचा राजकीय प्रभाव आहे त्यांना तो पुरस्कार मिळतो असे वादग्रस्त विधान योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी केले.
नवी दिल्ली – पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग केली जाते. हे सर्वांना माहित असणारे सत्य आहे. ज्यांचा राजकीय प्रभाव आहे त्यांना तो पुरस्कार मिळतो असे वादग्रस्त विधान योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी केले.
राजकीय प्रभाव असणा-या व्यक्ती पद्म पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरतात असे रामदेव म्हणाले. आपल्या क्षेत्रात अतुलनिय कार्य करणा-या चांगल्या व्यक्तींना पद्म भूषण, पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले जाते हे संपूर्ण जगाला माहित आहे तरीही हे पुरस्कार मिळवण्यासाठी लॉबिंग केली जाते असे रामदेव म्हणाले.
यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी बाबा रामदेव यांचे नाव सरकारच्या विचाराधीन असल्याची चर्चा होती. त्यावेळी रामदेव यांनी आपण कोणताही पद्म पुरस्कार स्वीकारणार नाही असे सांगितले होते.