ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्क भारता विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
अॅडलेड – ऑस्ट्रेलियाचा दुखापतग्रस्त कर्णधार मायकल क्लार्क भारता विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन निवड समितीने जाहीर केलेल्या तेरा सदस्यीय संघात क्लार्कचा अस्थायी समावेश केला असला तरी, त्याच्यासमोर फीटनेस सिध्द करण्याची अट ठेवली आहे.
क्लार्कचा संघात समावेश करताना निवड समितीने त्याला अॅडलेडमध्ये शुक्रवारपासून सुरु होणा-या दोन दिवसीय सराव सामन्यात खेळून फिटनेस सिध्द करायला सांगितले होते.
क्लार्कने अॅडलेडमध्ये होणा-या सराव सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. फिटनेस सिध्द करण्यासाठी शनिवारी सिडनीमध्ये होणा-य़ा सामन्यात खेळण्याचा प्रयत्न करेन असे क्लार्कने म्हटले आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियन निवड समिती क्लार्कला पहिल्या कसोटीसाठी संघातून वगळण्याची शक्यता आहे. चार डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.