विजेता कोलकाता नाईट रायडर्सनी आयपीएल-९मध्ये साखळी लढतीत बुधवारी गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ५ बाद १८७ अशी चांगली धावसंख्या उभारली.
कोलकाता- सलामीवीर, कर्णधार गौतम गंभीरसह (६४) ‘वनडाउन’ मनीष पांडे (५२) आणि आंद्रे रसेलच्या (३६) फटकेबाजीच्या जोरावर माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सनी आयपीएल-९मध्ये साखळी लढतीत बुधवारी गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ५ बाद १८७ अशी चांगली धावसंख्या उभारली.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीला पाचारण केला. मध्यमगती मिचेल मॅकक्लेनॅघनने सलामीवीर रॉबिन उथप्पाला (८) लवकर माघारी धाडले तरी कर्णधार गंभीरने मनीषसह दुस-या विकेटसाठी १० षटकांत १०० धावांची भागीदारी करताना कोलकाताचे शतक फलकावर लावले.
पांडेने आक्रमक पवित्रा घेत केवळ २९ चेंडूंत ५२ धावा फटकावल्या. त्यात तीन चौकार आणि तितक्याच उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. मनीषने रुद्रावतार धारण केल्याने गंभीरने सावध पवित्रा घेत ५२ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ६४ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेलने १७ चेंडूंत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा करताना यजमानांना दोनशेच्या घरात नेले.
गतविजेता मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. मॅकक्लेनॅघन (४-०-२५-२) तसेच ऑफस्पिनर हरभजन सिंगने (४-०-३१-१) थोडी फार चांगली गोलंदाजी केली तरी वेगवान गोलंदाज टिम साउदी (४ षटकांत ४३ धावा), हार्दिक पंडया (२ षटकांत २२ धावा) आणि जगदीश सुचितने
(२ षटकांत ३१ धावा) दहाहून अधिक धावा मोजल्या.