आयसीसी टी२० विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा २२ धावांनी पराभव केला.
मोहाली- आयसीसी टी२० विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा २२ धावांनी पराभव केला. विजयासाठी ठेवलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान २० षटकात ५ बाद १५८ धावाच करू शकला. हा सामना २२ धावांनी जिंकून न्यझीलंडने उपांत्यफेरीतील स्थान निश्चित केले आहे. तर या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सलामीवीर शरजीलच्या केवळ २५ चेंडूत ४७ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ११.१ षटकात २ बाद ९२ धावा केल्या होत्या. परंतु त्यानंतर झटपट गडी बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव गडगडला. आफ्रिदीने ९ चेंडूत १९ धावा केल्या. पाकिस्तानचा डाव २० षटकात १५८ धावांत आटोपला.
पाकिस्तानच्या शरजीलने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर शेहजाद ३०, लतिफ ३, अकमल २४, आफ्रिदी १९ मलिक १५ आणि सर्फराजने नाबाद ११ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून सेन्टॉर व मिल्ने यांनी प्रत्येकी दोन तर सोढीने आफ्रिदीचा महत्वपूर्ण बळी घेतला.
त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ५ बाद १८० धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गुप्टिलने ८० धावांची खेळी केली. कोरी अंडरसनने २१ तर रॉस टेलरने नाबाद ३६ धावा केल्या.
पाकिस्तानकडून सामी आणि आफ्रिदीने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर मोहम्मद इरफानने एक गडी बाद केला.