पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे.
चंदीगड – पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांच्यासोबतची बैठक रद्द केली आहे.
२९ जुलै ते एक ऑगस्टदरम्यान पाकिस्तान उच्चायुक्त चंदीगडच्या दौ-यावर येणार होते.
सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण गुरदासपूर जिल्हा हादरून गेला. यामध्ये चार पोलीस अधिकारी शहीद झाले तर तीन नागरिक ठार झाले. १५ जण या हल्ल्यात जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आठवड्यापूर्वी रशियात बैठक झाली. या बैठकीत दहशतवादाच्या उच्चाटनासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर आठवड्याभरानंतर हा दहशतवादी हल्ला झाला आहे.
सुमारे ११ तास गुरदासपूर जिल्ह्यात धुमश्चक्री सुरु होती. यात तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. यात गुरदासपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बलजित सिंग यांच्यासह तीन पोलीस शहीद झाले.