माजी आशियाई सुवर्णपदक विजेती धावपटू पिंकी प्रामाणिक पुरुष असल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोलकाता- माजी आशियाई सुवर्णपदक विजेती धावपटू पिंकी प्रामाणिक पुरुष असल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैद्यकीय चाचणीनंतर पिंकी पुरुष असल्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी बारासत न्यायालयात पिंकीविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पिंकीविरुद्ध बलात्कार, फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोलकाता येथील एमएसकेएम रुग्णालायत पिंकीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.
त्याआधी एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी पिंकीला १४ जून रोजी अटक केली होती. नंतर न्यायालयाने पिंकाला जामीन मंजूर केला होता.