येत्या काही दिवसात पेट्रोल स्वस्त होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी दिले.
नवी दिल्ली – येत्या काही दिवसात पेट्रोल स्वस्त होण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी दिले. पेट्रोलच्या किंमतीचा महिनाअखेर आढावा घेताना नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे.
डॉलर्सच्या तुलनेत सावरलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत झालेली घसरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मोईली वापरणार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
इंधन वाचवण्यासाठी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली हे दर बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार आहेत. येत्या ९ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला ते सुरुवात करणार आहेत. पेट्रोलियम खात्यातील सर्व अधिकारी व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या अधिका-यांना दर बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.