प्रो कबड्डी लीगच्या दुस-या हंगामातील रविवारी झालेल्या रंगतदार लढतीत प्रविण नेवाळेने एकाकी लढत देऊनही पुणेरी पलटनला गतविजेता जयपूर पिंक पँथर्सकडून २९- ३५ असा सहा गुणांनी पराभव पत्करावा लागला.
पटना- प्रो कबड्डी लीगच्या दुस-या हंगामातील रविवारी झालेल्या रंगतदार लढतीत प्रविण नेवाळेने एकाकी लढत देऊनही पुणेरी पलटनला गतविजेता जयपूर पिंक पँथर्सकडून २९- ३५ असा सहा गुणांनी पराभव पत्करावा लागला.
पुणे संघाला पराभूत व्हावे लागले तरी आक्रमक चढायांनी प्रविण नेवाळेने उपस्थितांची मने जिंकली तसेच जयपूरचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रात १३- १९ अशा पिछाडीला पडलेल्या पुण्याने दुस-या सत्रात तब्बल १३ गुण मिळवले. याचे श्रेय प्रविणला जाते. प्रविणने पहिल्या सत्रात तब्बल ५ मिनिटे आपल्या एका सहका-यासह खेळून काढले. दुस-या सत्रात ३७ व्या मिनिटाला जयपूरकडे फक्त ४ धावांची आघाडी होती. त्यावेळी प्रविण नेवाळेची पकड करत जयपूरने सुपर टॅकलचे २ गुण मिळवले आणि आपली आघाडी वाढवली.
जयपूरच्या विजयात सोनु नरवाल, जस्मीर सिंग आणि राजेश नरवाल यांनी मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सत्रातील आघाडी त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली. पुणेरी पलटनच्या प्रविण नेवाळेला सर्वोकृष्ट चढाईपटू तसेच जयपूरच्या कुलदिप सिंगला सर्वोत्कृष्ट बचावपटूचा पुरस्कार मिळाला.