तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलेल्या महिला रिकर्व्ह संघाने फिटा जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे.
कोलकाता – तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत(स्तर ४) मध्ये मेक्सिकोचा पराभव करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलेल्या महिला रिकर्व्ह संघाने फिटा जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे.
या विश्वचषकात दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजतेती दिपीका कुमारीने या स्पर्धेत दोन कांस्य आणि एक सुवर्णपदक पटकावले. यासोबतच तिने जागतिक क्रमवारीत १३ वे स्थान पटकावले आहे.
तर विश्वचषक स्पर्धेत रौप्य कामगिरी करणा-या पुरुष रिकर्व्ह संघाने फिटा क्रमवारीत चौथे स्थान मिळवले आहे.
पोलंड मधील रॉक्लो येथे रंगलेल्या तिरंदाजी विश्वचषकात कंपाऊंड मिश्र प्रकारातील रौप्य पदकासह भारताने पाच पदकांची कमाई केली होती.