जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपीची सत्ता आल्यानंतर विकासाची कामे होतील, अशी आश्वासने दोन्ही पक्षांनी दिली. मात्र, पाळली कोणीच नाही. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी आल्याआल्या आपल्या विधानांनी वाद निर्माण केले. काश्मीरमधील निवडणूक बिनधोकपणे पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेल्या सहकार्यामुळे सुरळीत पार पडली, असे सांगत त्यांचे जाहीर आभार मानले. त्यानंतर घेतलेला निर्णय तर देशाच्या विरोधातच होता. फुटीतरवादी नेता म्हणवून घेणारा मसरत आलम याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. काश्मीरमधील फुटीरतवादी नेते म्हणजे पाकिस्तानच्या कटपुतली बाहुल्या. दहशतवादी कारवाया, घातपाती कारवाया आता जम्मू-काश्मीरमधून कमी झाल्या असल्या तरी फुटीरतावादी नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी मोहीम पाकिस्तानने सुरू केली आहे. मसरत आलम हा जरी फुटरतावादी असला तरी तो इतर फुटरतावादी नेत्यांपेक्षा जास्त चिथावणीखोर वक्तव्य करणारा आणि सरळसरळ पाकिस्तानला आपला देश आणि भारताला शत्रू मानणारा आहे. मसरतच्या सुटकेनंतर भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. बुधवारी श्रीनगरमध्ये भारतविरोधी सभा घेऊन त्याने गरळ ओकलीच पण पाकिस्तानचे उघड समर्थन केले तसेच पाकिस्तानी झेंडे फडकवले. देशद्रोहाच्या आरोपातून आलमची सुटका झाली असताना आता पुन्हा त्याच मार्गाने जात पाकिस्तानी राग आळवला जात आहे. आलमच्या चिथावणीमुळे आतापर्यंत अनेक दंगलीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी केलेले गोळीबारात आधी काही महिन्यांपूर्वी काही तरुणांचा बळीही गेला होता. आलमने चिथावणी दिल्यामुळे काश्मीरमधील तरुणांची माथी भडकत आहेत. त्यात मुफ्ती सरकार आगीत तेल ओतत आहेत. आलमला देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त करत त्यांनी मुख्यमंत्री असतानाही फुटीरतावाद्यांना साथ देण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री आणि फुटीरतावाद्यांमधील हे साटेलोटे आता लपून राहिलेले नाही. यामुळे मुफ्ती यांच्या भूमिकेकडेही संशयाने पाहिले जात आहे. एका राज्याचा मुख्यमंत्रीच जर फुटीरतावाद्यांना साथ देत असेल आणि आलमसारख्या नेत्याला राज्यात भारतविरोधी सभा घेण्याची परवानगी देत असेल तर मुफ्ती आणि आलम यांची भूमिका भारतविरोधी राहणार, यात शंका नाही. जम्मू-काश्मीर हे देशातील एक राज्य आहे; परंतु त्याला विशेष स्थान देण्यात आलेले आहे. या राज्यातील नागरिकांना विशेष सवलतीही देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. वीज, पाण्याची विनामूल्य सुविधा देण्यात आलेली आहे. अशा सगळय़ा सवलती असतानाही मुख्यमंत्री मुफ्ती हे आलम यांच्या सूरात सूर मिसळून बोलत आहेत आणि वागत आहेत. आलम याच्या सुटकेचे समर्थन मुफ्ती आणि त्यांची मुलगी मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाने यावर कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. संसदेत यावरून विरोधकांनी भाजपाला घेरले; पण त्यानंतरही हतबल आहेत, अशी भूमिका भाजपाने मांडली. देशहिताबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा दावा करणारा भाजपा या निमित्ताने मात्र उघडा पडला. आलम फुटीरतावाद्यांचे पाप होता, आता या पापात भाजपाही सामील झाला आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on