अमेरिकेचा जगप्रसिद्ध जलतरणपटू मायकेल फेल्प्सने पॅन पॅसिफिक जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकवले.
गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया)- अमेरिकेचा जगप्रसिद्ध जलतरणपटू मायकेल फेल्प्सने पॅन पॅसिफिक जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदक पटकवले. विशेष म्हणजे या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. निवृत्तीनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमनानंतरचे फेल्प्सचे वैयक्तिक स्तरावरील हे पहिले पदक आहे.
१७ वर्षीय जलतरणपटूचा विक्रम
अमेरिकेची १७ वर्षीय जलतरणपटू केटी लेडेकीने ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तिचाच विश्वविक्रम मोडला. प्रस्तावित अंतर तिने ३:५८.३७ सेकंदात पार केले.