भारताचा ‘स्टार’ फलंदाज विराट कोहलीने ‘फेसबुक’वर छाप पाडली असून त्याच्या चाहत्यांची संख्या दोन कोटीहून अधिक झाली आहे.
नवी दिल्ली- भारताचा ‘स्टार’ फलंदाज विराट कोहलीने ‘फेसबुक’वर छाप पाडली असून त्याच्या चाहत्यांची संख्या दोन कोटीहून अधिक झाली आहे. ‘फेसबुक’वर सर्वात प्रसिद्ध क्रीडापटूंमध्ये २६ वर्षीय कोहली दुस-या स्थानी आहे. त्याच्यासमोर विक्रमवीर सचिन तेंडुलकरचे आव्हान आहे.
‘फेसबुक’वर सचिनला ‘फॉलो’ करणा-यांची संख्या अडीच कोटींच्या घरात आहे. ‘फेसबुक’वर सर्वाधिक ‘फॉलोअर्स’ असलेल्या जगभरातील क्रीडापटूंमध्ये सचिन १३वा आणि कोहली २०वा आहे.
पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यात अव्वल स्थानी आहे. त्याच्या ‘फॉलोअर्स’ची संख्या १० कोटींहून अधिक आहे.