बदलापूरमधील शिवसेना उपशाखाप्रमुख केशव मोहिते यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली.
बदलापूर- बदलापूरमधील शिवसेना उपशाखाप्रमुख केशव मोहिते यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात मोहिते यांचा मृत्यू झाला.
बदलापूरमधील एमआयडीसी परिसरात सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक असलेल्या मोहिते यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी रिक्षातच धारदार शस्त्राने हल्ला केला.
जखमी झालेल्या मोहिते यांना उपचारासाठी डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहिते यांच्या हत्येच्या निषेधार्थ बदालापूरमधील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत.