भारताने ओडिशा किनारपट्टीवर सोमवारी ब्राह्मोसचा कार्यकाळ वाढवणारी (लाईफ एक्सटेंशन प्रोग्राम) यशस्वी चाचणी घेण्यात आली.
भुवनेश्वर- भारताने ओडिशा किनारपट्टीवर सोमवारी ब्राह्मोसचा कार्यकाळ वाढवणारी (लाईफ एक्सटेंशन प्रोग्राम) यशस्वी चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राचा कार्यकाळ १० ते १५ वर्षांनी वाढवला जाणारे ‘ब्राह्मोस’ हे भारतातील अशा प्रकारचे पहिले क्षेपणास्त्र ठरले आहे.
ब्राह्मोसची ही चाचणी ओडिशा किनारपट्टीवरील चांदीपूर येथे सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी झाली. क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण मोबाईल लाँचरद्वारे करण्यात आले. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही यासाठी ब्राह्मोसच्या टीमचे आणि डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की ब्राह्मोसच्या टीमने आणि डीआरडीओने पहिल्यांदाच ब्राह्मोसचा कार्यकाळ वाढवणारे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याची यशस्वी चाचणी केली आहे.