दिल्लीत सरकार स्थापण्यासाठी आपच्या (आम आदमी पक्ष) आमदाराला पैसे देताना भाजप नेत्याचे ‘ऑपरेशन पर्दाफाश’ या नावाने आपने स्टिंग ऑपरेशन केले आहे.
नवी दिल्ली- दिल्लीत सरकार स्थापण्यासाठी आपच्या (आम आदमी पक्ष) आमदाराला पैसे देताना भाजप नेत्याचे ‘ऑपरेशन पर्दाफाश’ या नावाने आपने स्टिंग ऑपरेशन केले आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष नेत्यांसोबत पत्रकार परिषद बोलावून हे स्टिंग ऑपरेशन उघडकीस आणले.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपचे उपाध्यक्ष शेर सिंह डागर हे ‘आप’चे आमदार दिनेश मोहनिया यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी पैसे देण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मोहनिया संगम विहार विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.
मोहनिया यांना भाजपमध्ये येण्यासाठी डागर यांनी चार कोटी रुपयांची ऑफऱ दिला होती. भाजपने आमच्या अनेक आमदारांशी संपर्क करुन त्यांना प्रलोभने देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपचे नेता मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
दिल्लीत भाजप सरकार बनविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्याकडे केवळ ३२ आमदार आहेत. संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने असे प्रकार सुरु केल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात येत आहे.
दिल्ली प्रदेश बीजेपी उपाध्यक्ष शेर सिंह ने आप के संगम विहार से विधायक दिनेश मोहनिया को 4 करोड़ रुपये में खरीदने की कोशिश की।
#BJP
EXPOSED
— Manish Sisodia (@msisodia) September 8, 2014
शेर सिंह डागर और उसके साथी रघुवीर दहिया की पूरी करतूत को आम आदमी पार्टी ने खुफिया कैमरे में कैद कर लिया है।
#BJP
EXPOSED
— Manish Sisodia (@msisodia) September 8, 2014