देशात एकूण १०० अब्जाधीश असून त्यांची एकत्रित संपत्ती १७५ अब्ज डॉलर्स आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारत हा अब्जाधीशांमध्ये सहाव्या क्रमांकावरचा देश ठरला आहे.
सिंगापूर/नवी दिल्ली- जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची प्रतिमा अधिकाधिक उंचावत असल्याचे उघड होत असतानाच देशातील अब्जाधीशांची वाढत चालली आहे. देशात एकूण १०० अब्जाधीश असून त्यांची एकत्रित संपत्ती १७५ अब्ज डॉलर्स आहे. लोकसंख्येच्या तुलनेत भारत हा अब्जाधीशांमध्ये सहाव्या क्रमांकावरचा देश ठरला आहे.
‘वेल्थ एक्स’ आणि ‘यूबीएस बिलिनियअर’ या संस्थांनी भारतातील अब्जाधीशांबाबत अहवाल तयार केला आहे. जुलै २०१३ ते जून २०१४ दरम्यान जागतिक अब्जाधीशांची पाहणी करण्यात आली. गेल्यावर्षी या भारतात १०३ अब्जाधीश होते. यंदा त्यात तीनने घट झाली आहे.
जागतिक पातळीवर अब्जाधीशांची संख्या २३२५ वर पोहचली आहे. २०१४ मध्ये आतापर्यंत त्यात १५५ नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. २०१३ च्या तुलनेत त्यात सात टक्क्याने वाढ झाली. जगातील श्रीमंतांच्या संपत्तीत १२ टक्के वाढ झाली असून ती ७.३ लाख कोटी डॉलर्स झाली आहे. डाऊ जोन्स निर्देशांकात नोंदवल्या गेलेल्या सर्व कंपन्यांच्या भांडवलापेक्षा ही रक्कम अधिक आहे.
स्वित्झर्लंड, हाँगकाँग, फ्रान्सपेक्षाही भारतात सर्वात जास्त अब्जाधीश राहतात. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत २८ अब्जाधीश राहतात. जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहणा-या शहरांमध्ये मुंबईचा २० वा क्रमांक आहे. न्यूयॉर्कमध्ये १०३ अब्जाधीश राहतात.
अमेरिकेतील सर्वाधिक जास्त ५७१ अब्जाधीश राहत असून चीनमध्ये १९०, इंग्लंडमध्ये १३० जण राहतात. तर दहशतवादी देशांमध्ये ४० अब्जाधीश राहतात. युरोपमधील अब्जाधीशांची संख्या २.३७ लाख कोटी डॉलर्स आहे. आशियातील अब्जाधीशांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. त्यापैकी सर्वात जास्त चीनमध्ये राहतात, असे अहवालात नमूद केले आहे.