एफआयएच पुरुषांच्या चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सलामीला शुक्रवारी भारताने गतविजेता जर्मनीला चांगलेच झुंजवले.
लंडन- एफआयएच पुरुषांच्या चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत सलामीला शुक्रवारी भारताने गतविजेता जर्मनीला चांगलेच झुंजवले.
जगज्जेत्यांनी पिछाडी भरून काढताना ३-३ अशी बरोबरी साधली. पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखालील भारतासाठी ही कामगिरी आत्मविश्वास उंचावणारी ठरणार आहे.
जर्मनीविरुद्ध भारताला मोठी शिकस्त द्यावी लागेल, असे वाटत होते. मात्र भारताने धडाकेबाज खेळ केला. सातव्या मिनिटाला व्ही. आर रघुनाथने भारताचे खाते उघडले. त्यानंतर २६व्या मिनिटाला मनदीप सिंगने आघाडी वाढवली.
३२व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने भारताची आघाडी वाढवली. मात्र टॉम ग्रँबुशने १० मिनिटांत दोन गोल करताना भारताची आघाडी कमी केली.
खेळ संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना जोनास गोमोलने आणखी एक गोल करताना भारताला विजयापासून रोखले.