भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ११ ऑक्टोबरला फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणा-या दुस-या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी जबरदस्त उत्साह आहे.
नवी दिल्ली- भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ११ ऑक्टोबरला फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणा-या दुस-या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यासाठी जबरदस्त उत्साह आहे. या सामन्यासाठी ५००, ७००, १०००, ५००० आणि ८००० रुपये असे दर ठेवण्यात आले आहेत.
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडीजने जिंकला. पाहुणा संघ मालिकेत सध्या १-० ने पुढे आहे.
९८, दरयागंज येथे तिकीट विक्रीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून या सामन्याची काही तिकिटे ऑनलाइन www.bookmyshow.com येथे उपलब्ध असल्याचे डीडीसीएचे अध्यक्ष स्नेह बंन्सल यांनी सांगितले. काही तिकिटे कॉम्प्लीमेंट्री आणि क्लबच्या सदस्यांना देण्यात आली आहेत.