देशातले स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकारचे अनेक मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीसुद्धा स्त्री भ्रूणहत्येच्या प्रमाणात म्हणावी, तशी घट होत नाही. काही जिल्हयांमध्ये आणि राज्यांमध्ये सातत्याने केलेल्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रमाणात घट झाली आहे आणि मुला-मुलींच्या जन्माच्या प्रमाणातला असमतोल किंचितसा कमी झाला आहे. मुळात हा असमतोल कमी होण्याचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे ०.१ टक्का किंवा ०.२ टक्का असे आहे आणि हा प्रवाहसुद्धा अपवादात्मक ठिकाणी आढळून आलेला आहे. मात्र, सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. स्त्रीभ्रूणहत्येसाठी आधी लिंगनिदान केले जाते आणि ते अल्ट्रा सोनोग्राफी मशिनद्वारेच केले जात असल्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण कमी करण्याचा एक उपाय म्हणून या यंत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे संबंधित सरकारी अधिका-यांना वाटते. त्यांनी त्या दृष्टीने काही प्रयत्नही केले आहेत. जे डॉक्टर लिंगनिदान करतील आणि तसे त्यांनी केल्याची वार्ता मिळेल तेव्हा त्यांचे सोनोग्राफी मशीन जप्त करण्याचा एक उपाय सरकारी यंत्रणेने योजलेला आहे. ही वाईट प्रवृत्ती एवढी व्यापक आहे की, तिला कितीही आळा घातला तरी तो कमीच आहे आणि आळा घालण्यासाठी केलेल्या उपायाचे परिणाम फार सावकाशपणे आणि नगण्य इतक्या प्रमाणात आढळतात. आता या सोनोग्राफी यंत्रांच्या नियंत्रणाचा विषय असाच आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनोग्राफी यंत्रांवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायाचे काही परिणाम जाणवले आहेत. ते नगण्य असले तरी ते जाणवले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. राज्यात सरकारी यंत्रणेला कळू न देता लिंगनिदान करण्यात येत असल्याच्या ५४२ तक्रारी मिळाल्या आहेत. त्या हेल्पलाइनवरून मिळालेल्या आहेत. या तक्रारीवरून अधिक चौकशी केली असता त्या ख-या असल्याचेही आढळले आहे. ५४२ पैकी ५०९ प्रकरणात आधीच सूचना मिळाली होती. त्यामुळे त्या प्रकरणातले लिंगनिदान आणि पुढे होणारी संभाव्य भ्रूणहत्या टळली. मात्र अशा प्रवृत्तीच्या डॉक्टरांकडील सोनोग्राफी यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. यावरूनच सोनोग्राफी यंत्रांचे नियंत्रण हा स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा एक चांगला उपाय म्हणून ध्यानात आलेला आहे. आता त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारी यंत्रणेने या नियंत्रणातल्या अडचणी दूर करण्यावर भर दिला आहे. असे आढळले होते की, सोनोग्राफी यंत्रांची नोंदणी होत आहे. परंतु त्यांना नोंदणी क्रमांक दिले जात नाहीत व क्रमांक नोंदलेले नसल्यामुळे त्यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून आता वाहनांप्रमाणेच सोनोग्राफी यंत्रांनासुद्धा नोंदणी क्रमांक देण्याची कल्पना पुढे आली आहे. असे क्रमांक दिले म्हणजे सरकारी कर्मचा-यांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल, असे सरकारच्या प्रतिनिधींना वाटते. आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. ब-याच सरकारी अधिका-यांनी सोनोग्राफी यंत्रांना क्रमांक दिल्यास त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल, असे मत व्यक्त केले आहे. तेव्हा आरोग्य विभागाच्या या नव्या सूचनेचे स्वागत केले पाहिजे. या उपायाने स्त्रीभ्रूणहत्या निर्णायक एवढी थांबणार नसली तरी तिचा अल्पसा का होईना उपयोग होईलच.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on