उत्तर प्रदेशमधील बदाऊ येथे दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्या प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.
बदाऊ- उत्तर प्रदेशमधील बदाऊ येथे दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्या प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची तसेच मदन नको तर या न्याय हवा अशी मागणी त्यांनी केली.
बदाऊ येथील दोन बहिणींवर २७ मे रोजी बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. यातील पाच आरोपींपैकी दोन पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी मुलींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच काँग्रेस पक्ष त्यांना सर्व प्रकारची मदत करेल असे आश्वासन दिले.
आपला राज्यातील पोलिसांवर विश्वास नसल्याचे हत्या झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांनी राहुल गांधींना सांगितले. राजधानी दिल्लीत १६ डिसेंबर रोजी धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारापेक्षा ही घटना भयानक असल्याचे मुलींच्या कुटुंबीयांनी म्हणणे आहे.