मराठी रंगभूमी आणि कलासृष्टी ही आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, हे दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र कलानिधी आणि म्हैसकर फाऊंडेशन यांच्या संयुक्तिक विद्यमाने मकाऊ बेटावर मिक्ता सोहळा पार पडला. भारताच्या बाहेर कुठेतरी एखादा पूर्णपणे मराठमोठा कार्यक्रम साजरा होतोय, ही मराठी माणसाला अभिमान वाटणारी गोष्ट असते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने, मध्येच मराठी नृत्यांचे बहारदार सादरीकरण असा सारा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा हा महाराष्ट्राबाहेर होणारा जागर मराठीला सातासमुद्रापार नेणारा आहे. आता तरी मराठी माणसावर कोणी कुपमंडूकवृत्तीचा आरोप करणार नाहीत. या ‘मिक्ता’ सोहळ्यावर छाप उमटवली ती अपेक्षेप्रमाणेच ‘दुनियादारी’ या चित्रपटाने. सत्तरच्या दशकातील महाविद्यालयीन मित्रांची गोष्ट सांगणा-या या चित्रपटाने समस्त मराठी रसिकांच्या मनाला साद घातली. आजच्या पिढीतील तरुणांपासून ते आजी-आजोबांपर्यंत असंख्य मराठीजनांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिला, ही बाब खूप मोठी आहे. ‘दुनियादारी’ निव्वळ गल्लाभरू चित्रपट नाही. ‘दुनियादारी’त आगळावेगळा विषय हाताळूनसुद्धा त्याने व्यावसायिक विक्रम रचला आहे. आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढत या चित्रपटाने पहिल्या सात आठवडय़ात २२ कोटी रुपयांची कमाई केली. या पूर्वी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, गटरंग, बीपी अशा काही मोजक्या चित्रपटांनी कोटय़वधीमध्ये कमाई केली होती. धग, बालक-पालक, आजचा दिवस माझा अशा पठडीबाहेरचे विषय हाताळणा-या मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे नाना पाटेकर आणि शरद पवार यांना दिलेले ‘गर्व महाराष्ट्राचा’ हे पुरस्कार. या पुरस्कारांनंतर पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. पवार हे या कार्यक्रमात बरेच अंतर्मुख होऊन आणि जीवनाचे सिंहावलोकन करून मनापासून बोलले. पवार यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत आईने दिलेल्या शिकवणीचा उल्लेख केला. कोणतेही काम आत्मविश्वासाने पार कसे पाडावे आणि जबाबदारीच्या जाणीवने त्याकडे कसे पाहावे, ही शिकवण आईनेच दिली असे ते म्हणाले. त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांची गेल्या वर्षीच जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने काही कार्यक्रम झालेसुद्धा; परंतु पवार यांनी या मौलिक मुलाखतीमध्ये त्यांचा उल्लेख केला. नाना पाटेकर हा मराठी माणसाला खरोखरीच अभिमान वाटावा असा अभिनेता आहे. नानाच्या एकंदर कामगिरीकडे मागे वळून पाहिले असता एक मराठमोठा अभिनेता कसा कसा घडत गेला. आपल्या परिश्रमाने आणि कलेविषयीच्या प्रेमाने कसा वरच्या शिखरावर जाऊ शकतो, हे लक्षात येते. त्यामुळेच या दोघांना दिलेला पुरस्कार यथोचित ठरला. एकंदरीतच, मकाऊ बेटावर झालेला हा महाराष्ट्र संस्कृतीचा जागर मराठी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवणारा ठरला आहे, हे नि:संशय.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on