सीबीआय न्यायालयाने बजावलेल्या समन्सविरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर एक एप्रिलला सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली – सीबीआय न्यायालयाने बजावलेल्या समन्सविरोधात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर एक एप्रिलला सुनावणी होणार आहे.
तालबिरा-२ या कोळसा खाणीचे वाटप करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवत सीबीआय न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. याप्रकरणी त्यांना आठ एप्रिलला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस पक्षाने मनमोहन सिंग यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी सिंग यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली.