गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून महागाई कमी करण्यावरच अधिक भर राहील, असे स्पष्ट करताना व्याजदर वाढीचे संकेत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी दिले.
नवी दिल्ली- गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी रिझव्र्ह बँकेकडून महागाई कमी करण्यावरच अधिक भर राहील, असे स्पष्ट करताना व्याजदर वाढीचे संकेत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सोमवारी दिले. लोकसभा निवडणुकांमधून देशात स्थिर सरकार दिल्यास आर्थिक सुधारणांना चालना मिळेल. यामध्ये वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशात सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेच्या पायावर परिणाम करणा-या प्रमुख घटकांवर आमचा विशेष भर राहील. यामध्ये महागाईचाही समावेश असल्याचे राजन म्हणाले. महागाई कमी होत असल्याची गुंतवणूकदारांत भावना निर्माण झाली तर देशातीलच नव्हे तर परदेशी गुंतवणूकदारांकडूनही रुपयावर डाव लावण्याची तयारी दाखवली जाईल आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे, असे राजन यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन बोलत होते.