सहकार क्षेत्रातील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2011-12 या आर्थिक वर्षात 175.39 कोटींचा निव्वळ नफा झाला.
मुंबई- सहकार क्षेत्रातील दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 2011-12 या आर्थिक वर्षात 175.39 कोटींचा निव्वळ नफा झाला. नुकताच मुंबईत पार पडलेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार अग्रवाल यांनी बँकेची आर्थिक आकडेवारी सादर केली.
मार्च 2011 च्या अखेरीस बँकेला 251.51 कोटींचा तोटा झाला होता. तर 2011-12 या वर्षात बँकेने चांगली कामगिरी केल्यामुळे नफा झाला असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या वर्षात बँकेला 266.90 कोटींचा ढोबळ नफा झाला. तसेच मार्चअखेरीस बँकेचे भागभांडवल 444.65 कोटी आहे. तर एकूण ठेवी 15,862.39 कोटी आणि कर्जे 3,965.71 कोटी इतके आहे. तर बँकेचे खेळते भांडवल 24,289.81 कोटी आहे.